भुसावळ- मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, नरीमन पॉइंट येथे झालेल्या 64 व्या रेल सप्ताह समारंभात भुसावळ रेल्वे विभागाला उत्कृष्ट कार्याबद्दल पाच शिल्ड व पारीतोषिक देण्यात आहे. पारीतोषिक आणि शील्ड मिळालेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव यांनी सर्वांचे कौतुक केले. सर्वांच्या उकृष्ट कार्याबद्दल हा सन्मान प्राप्त झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी मार्गदर्शन करताना काढले. यंदा पाच शील्ड मिळाल्या असून यापुढे अजुन जोमाने चांगले कार्य करा, यापेक्षा जास्त शील्ड आणि पारितोषिक आपल्या विभागाला मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पाच विभागांना पारीतोषिक
भुसावळ विभागाला सुरक्षा, कार्मिक, इंजीनियरींग, पीओएच वर्कशॉप आणि पूर्ण मध्य रेल्वेत नाशिक रेल्वे स्थानकाला स्वच्छ स्टेशन हे पाच पारीतोषिक प्राप्त झाले. या प्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, वरीष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरीष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, वरीष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरओ) प्रदीप ओक, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजीव दीक्षित, मुख्य कार्यालय अधीक्षक एस.डी.वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.