भुसावळ रेल्वे स्थानकाचा निरीक्षक दिनेश नायरांनी स्वीकारला पदभार

0
भुसावळ:- जंक्शन स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक विनोदकुमार लांजीवार यांची अकोला येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर ठाणे येथून निरीक्षक दिनेश नायर यांची नियुक्ती झाली. त्यांनी बुधवारी सायंकाळी लांजीवार यांच्याकडून पदभार स्विकारला. लांजीवार यांनी येथे दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. निरीक्षक नायर हे ठाणे येथून बदलून आले असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासह अनधिकृत बाबींना पायबंद घालण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असेल, असे त्यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.