भुसावळ विभागात उत्साहाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत

0

भुसावळ। शाळेच्या पहिल्या दिवशी शहरासह परिसरातील विविध प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळांप्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाफुलांचे तोरण, रांगोळ्या काढून, पताके, फुगे लावून इमारती सजविण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून आरती ओवाळून स्वागत करण्यात आले.

बर्‍हाटे विद्यालय
येथील सुमनबाई बर्‍हाटे शिशुविहार, स्वा.सै.कृ.पा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पुंडलिक गणपत बर्‍हाटे माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रसंगी संस्थाध्यक्ष परिक्षित बर्‍हाटे, मुख्याध्यापक सुधीर पाटील, मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी, संचालक यशवंत भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना पुष्प देवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे स्वागत केले. विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शेवटी मिष्ठान्न भोजन झाले. यावेळी संचालक रमाशंकर दुबे, माजी नगरसेवक पवन बुंदेले उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा परिषद शाळा, साकेगाव
येथील जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बैलगाडीवर बसवून ढोल ताशांच्या गजरात शाळेत दाखल करून गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपगटनेता रविंद्र नाना पाटील, सरपंच आनंद ठाकरे, उपसरपंच शकिल पटेल, माजी सरपंच विजय पाटील, बाजार समिती संचालक संतोष भोळे, साबीर पटेल, अनंता सोनवणे, प्रविण पवार, इंदिरा गांधी विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील, संतोष लोणे, गोपाळ पाटील, वामन कचरे, मुख्याध्यापक जी.आर. चौधरी, मुख्याध्यापक मोतीराम जोगी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शे. रिजवान यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बियाणी इंग्लिश मिडियम स्कुल
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पताका फुगे लावून शाळेची इमारत सजविण्यात आली. प्रवेशद्वाराजवळ शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे कुमकुम टिळा लावून आरती ओवाळून फुले उधळण्यात आली. कार्टुनच्या वेशात विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करून स्वागत करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सिस, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार उपस्थित होते.

अहिल्यादेवी कन्या विद्यालय
मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या हस्ते शालेय प्रार्थना आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.

के.नारखेडे विद्यालय
शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय प्रार्थनेनंतर पाचवीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत व पुस्तकांचे वाटप चेअरमन पी.व्ही. पाटील, सचिव प्रमोद नेमाडे, विकास पाचपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापक एस.व्ही. वारके, उपमुख्याध्यापक एन.बी. किरंगे, पर्यवेक्षक आर.ई. भोळे, बी.ए. पाटील उपस्थित होते. यावेळी शाळेतून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका एन.एम. भारंबे, वाय. एन. झोपे, एस.पी. महाजन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. दरम्यान 14 रोजी सकाळी 7 ते 11वा. शाळापूर्व तयारी साठी विद्यार्थ्यांशी प्रत्येक्ष घरभेटी व शैक्षणिक पदयात्रा उपक्रम राबविण्यात आला.

नगरपालिका शाळा क्रमांक 2
नगरपालिका शाळा क्रमांक 2 आज शाळेचा पहीला दिवस नविन विद्यार्थ्यांचे नगरसेवक मुकेश पाटील यांच्याहस्ते गुलाब पुष्प देवुन स्वागत करण्यात आले तसेच शालेय आभ्यासिका वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

घोडसगाव, ता.मुक्ताईनगर
येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत चालु शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिवसानिमित्त शाळेतील नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रसंगी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण आमदार एकनाथराव खडसे, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आचेगाव जिल्हा परिषद शाळा
शाळेत सकाळी 9 ते 10 वाजता ग्रामपंचायत पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते संदीप सुरवाडे यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट देवून मिरवणूक काढून उत्साहात शाळेत प्रवेश दिला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संत गाडगेबाबा हायस्कुल
शाळेचा पहिला दिवस ’प्रवेशोत्सव’ व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत (महाराष्ट्र शासन) संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यालय व स्व.सुशिलाबाई नामदेव फालक प्राथमिक विद्या मंदिर शाळेमध्ये नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.