भुसावळ विभागात नवदुर्गेचे शांततेत विसर्जन

0

ढोल-ताशांच्या गजरासह लेझीम पथकावर थिरकली तरुणाई ; पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

भुसावळ- भुसावळ विभागात नऊ दिवसांच्या उत्सवानंतर नवदुर्गेचे मोठ्या भक्ती भावात विसर्जन शनिवारी विसर्जन करण्यात आले. ठिकठिकाणी महिला, तरुणींसह तरुणाईने पारंपरीक वाद्यांच्या गजरात टिपर्‍या खेळत नृत्य करीत दुर्गा मातेला प्रेमाचा निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत विभागात मिरवणुकीचा जल्लोष सुरूच होता. पोलिस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून तगडा बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला होता.

भुसावळात 169 मंडळांकडून नवदुर्गेला निरोप
भुसावळ- शहर व बाजारपेठ हद्दीत यंदा 169 मंडळांनी नोंदणी केली होती तर शनिवारी सायंकाळी प्रमुख विसर्जन मिरवणुकीत 44 मंडळे सहभागी झाली होती. दुपारी एक वाजता दुर्गा विसर्जन मिरवणुकीला बाजारपेठेतील नृसिंह मंदिरापासून सुरुवात झाली. रांगेत सर्वप्रथम आलेल्या साधना नवदुर्गा मंडळाच्या पदाधिकार्‍यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला तर मानाची पूजा आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युवराज लोणारी, पुरूषोत्तम नेमाडे, राजू खरारे, नगरपालिका अधिकारी तसेच बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार, शहरचे बाबासाहेब भोंबे, तालुक्याचे चंद्रकांत कुंभार तसेच सहा दुय्यम अधिकारी, 200 पोलिस कर्मचारी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पाच, शहर वाहतूक शाखेचे पाच कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती.

बसस्थानकाचे स्थलांतर ; गावातील अनेक मार्ग बंद
मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळ बसस्थानकाचे सकाळपासून स्थलांतर करण्यात आले होते शिवाय येणारी येणारी जड वाहतूक थांबवण्यात आली होती शिवाय ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरीकेटींग करून मार्ग अडवले होते. पालिका प्रशासनातर्फे विसर्जन मार्गवर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

रावेरला दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मंडळांचा जल्लोष
रावेर- शहरात मोठ्या भक्तीमय वातावरणात शुक्रवारी सायंकाळी दुर्गा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात लेझीम मंडळे, दुर्गा उत्सव मंडळे त्यात सहभागी झाली. ढोल-ताश्यांच्या गजरात व लेझीम पथकाच्या तालावर मिरवणूक निघाली असून पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

या मंडळांचा सहभाग
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत सिद्धीविनायक व्यायाम शाळा, त्रिमूर्ती दुर्गा उत्सव समिती, प्रताप व्यायाम शाळा, पवन व्यायाम शाळा, अफूगल्ली दुर्गा उत्सव मंडळ, अंबिका व्यायाम शाळा, आठवडेे बाजार मंडळ, शिवराणा दुर्गा उत्सव मंडळ, साई शिवाजी व्यायाम, शिवाज्ञा व्यायाम शाळा, शिवाजी व्यायाम शाळा, नागवेल लेझीम मंडळ, भगतसिंग व्यायाम शाळा, सत्यशोधक महात्मा फुले व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा, पवन व्यायाम शाळा, सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती यांच्यासह मोठ्या संख्येने दुर्गोत्सव मंडळे सहभागी झाली आहेत.

लोकप्रतिनिधींनी दिल्या मंडळांना भेटी
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रत्येक मंडळाला भेट दिली. मिरवणुकीदरम्यान तहसीलदार विजयकुमार ढगे, माऊली फाउंडेशन अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, नगरसेवक जगदीश घेटे, राजेंद्र महाजन, पद्माकर महाजन, मुन्ना अग्रवाल, रवींद्र महाजन, अय्यूब खा, असदउल्ला खा, सादीक शेख, अनिल अग्रवाल, सुधाकर महाजन, मनोज श्रावक, पप्पू गिनोत्रा, भूषण महाजन, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, यशवंत दलाल, भास्कर महाजन शिरीष वाणी,अमोल पाटील,भास्कर पहेलवान, सुधाकर नाईक, अशोक शिंदे, डी.डी.वाणी, काझी साहेब, दीपक नगरे, शेख गयास, सुनील महाजन, डी.एन.वाणी, वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता योगेश पाटील यांच्यासह मोठ्या संखेने मोठ्या संखेने भक्तगण सहभागी झाले. मिरवणुकीसाठी मुस्लिम पंच कमेटी, शांतता समिती सदस्य परीश्रम घेत आहेत. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाडळे, फौजदार मनोहर जाधव यांच्यासह चार पोलिस अधिकारी, 50 होमगार्ड एसआरपी तुकडी असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यावल तालुक्यात रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा उत्साह
यावल- शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 57 गावात 181 सार्वजनिक व 20 खाजगी अशा 201 दुर्गोत्सव मंडळा पैकी शुक्रवारी यावल शहर व 54 गावातील 180 मंडळाकडून मोठ्या उत्साहात व शांततेत विर्सजन पार पडले. शहरात मुख्य मिरवणुक दुपारीच सुरुवात झाली. यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत यावल शहर सह 54 गावातील दुर्गोत्सव मंडळानी शुक्रवारी देवी विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले. शहरात एकूण 40 सार्वजनिक तर तीन खाजगी असे 43 मंडळ होते.

कडेकोट बंदोबस्तात विसर्जन
पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, उपनिरीक्षक दीपक ढोमणे व त्या-त्या बीट हद्दीतील पोलिस कर्मचारी वर्गाने व होमगार्डच्या पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला. मिरवणूक महाजन गल्ली, बोरावल गेट, म्हसोबा, गवत बाजार, काजीपुरा मस्जीद, चावडी, कोर्ट रोड मार्गे रेनुका देविच्या मंदिरामार्गे पुढे विर्सजनास मार्गस्त झाली. मंदिरा जवळ महाराज नारायण रामदास बयाणी यांच्या वतीने प्रत्येक देवीचे पूजन करण्यात आले.

किनगावात साध्या पद्धत्तीने विसर्जन
किनगावात 15 ऑक्टोंबरर ोजी रात्री अपघातात गावातील जितेश कोळी व महेश कोळी या तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावातील सर्वचं दुर्गोत्सव मंडळांनी केवळ जागेवर वाद्य वाजवून मिरवणूक साध्या पध्दतीने काढून देवीला निरोप दिला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता व पुरेशा पोलिस बंदोबस्त अभावी तालुक्यातील साकळी, अट्रावल व सांगवी बुद्रुक येथे शुक्रवारी विर्सजन करण्यात न आल्याने शनिवार, 20 विर्सजन मिरवणूक काढली जाणार आहे.