भुसावळ- रेल्वे प्रशासनाने फुकट्या रेल्वे प्रवाशांविरुद्ध मोहिम सुरू केली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दंडाची वसुली केली जाणार आहे. रेल्वे पॅसेंजर गाड्यांसह स्लीपर डब्यातून प्रवास करणारे तसेच रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट न काढताच वावरणार्या 12 विशेष पथकांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे डीआरएम आर.के.यादव यांनी सांगितले. प्रत्येक धावत्या गाडीतही स्वतंत्र पथकाद्वारे अचानक तपासणी केली जाणार आहे. वरीरष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी शुक्रवारी भुसावळ विभागात साध्या वेशातील तिकीट निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात बडनेरापासून ते नाशिकरोडपर्यंत आणि खंडवा ते भुसावळ जंक्शनपर्यंतच्या सर्वच मोठ्या रेल्वे स्थानकांवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई होणार आहे.