तीन दिवसांपासून विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून कामकाज : ऑनलाईन औषधे विक्रीला विरोध
भुसावळ- ऑनलाइन फार्मसी अर्थात ई फार्मसीच्या विरोधात भुसावळ विभागात केमिस्ट असोसिएशनने शुक्रवारी राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने रुग्णांचे पहिल्याच दिवशी चांगलेच हाल झाले. भुसावळ शहरासह तालुक्यातील तब्बल 252 मेडीकल स्टोअर्स या संपामुळे सकाळपासून बंद होते. हॉस्पीटलमधील आपत्कालीन उपचारांसाठी मात्र नेहमीप्रमाणे मेडीसीन उपलब्ध झाले. उर्वरित किरकोळ आजारांच्या रुग्णांचे मात्र या संपामुळे हाल झाले.
भुसावळात 252 दुकाने बंद
ई. फार्मसी व इंटरनेटच्या माध्यमातून होणार्या औषधांची बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीबद्दल अनेक केसेस दाखवल्या. या समस्येच्या गांभीर्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दोन वेळा एका दिवसाकरिता औषध दुकाने बंद करून निषेध केला होता. तरीही ऑनलाइन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघण करत आहेत. अधिकार्यांनी त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे केमिस्ट असोसिएशनने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. या इशार्यानुसार शुक्रवारी शहरातील तब्बल 175 व तालुक्यातील 102 अशी एकूण 252 होलसेट व रिटेल मेडीसीन विक्रीची स्टोअर्स बंद ठेवण्यात आली. केमिस्ट असोसिएशनने केलेल्या आरोपानुसार ऑनलाइन कंपन्या कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही जबाबदारी शिवाय कार्य करत आहेत. औषधाचे सत्यापन केल्याशिवाय ऑर्डर मंजूर करत आहेत. एमटीपी किट्स, सिल्डेनफिल, टॅडलफिल, कोडेन सारखी गुंगी आणणारी औषधे डॉक्टरांचा सल्ला न घेता विकली जातात. जुन्या व बनावटी प्रीस्क्रिप्शनसवरून औषधांची विक्री होते, ऑनलाइन कंपन्या औषध कायद्याच्या कलम 18 क च्या तरतुदीचे उल्लंघन करीत जाहिरात करत आहेत, असे अनेक उदाहरण संघटनेच्या माध्यमातून उघड करून दाखवली तरी देखील कारवाई होत नाही. यामुळे संप करीत असल्याचे निवेदन केमिस्ट असोसिएशनने बुधवारी प्रांताधिकार्यांना दिले होते. किरकोळ आजारांच्या ओपीडीनंतर प्रिस्पीक्र्पशनवर लिहून दिलेले औषधे मेडीकल स्टोअर्समधून मिळू न शकल्याने रुग्णांना नाहक त्रास झाला.
भुसावळ विभागात रुग्णांचे हाल
भुसावळप्रमाणे यावलसह मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील केमिस्ट बांधवही संपात सहभागी झाल्याने ग्रामीण भागातून औषधी घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे चांगलेच हाल झाले. तातडीच्या रुग्णांसाठी मात्र औषधे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. रुग्णालंमध्ये मात्र रुग्णांना सुविधा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला.