कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह मिरवणूक रद्द : छत्रपतींच्या पुतळ्यासाठी वंदनासाठी दिवसभर उसळली गर्दी
भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त शुक्रवार, 19 रोजी भुसावळ विभागात अभिवादन करण्यात आले. भुसावळ शहरासह व विभागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द असले तरी शहरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांनी साधेपणाने शिवजयंती साजरी केली. रेल्वे स्थानक परीसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यासाठी दिवसभर गर्दी जमली होती.
दे.ना.भोळे महाविद्यालय
भुसावळ : दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.जी.पी.वाघूळदे, प्रा.डॉ.डी. एस.राणे, प्रा.ए.आर.सावळे उपस्थित होते.
महाराणा प्रताप विद्यालय
भुसावळ : महाराणा प्रताप विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे, पर्यवेक्षिका मोरे, शिक्षक वृंद उपस्थित होते. अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेश ठोसर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
रेल्वे एमओएच शेड
भुसावळ : रेल्वेच्या एमओएच शेडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हिमांशू रामदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, सौरभ गोयल, अंकीत बंसल, ललित भारंबे, योगेश माळी, रणजीत चौधरी, विशाल सपकाळे, राजू वानखेडे, संजय भारंबे, दीपक सूर्यवंशी व इतर कार्यकर्ते तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.