भुसावळ विभागात शिव शंकराचा गजर

0

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी

भुसावळ/रावेर- महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर भुसावळ विभागातील शिव मंदिरे सजली असून पहाटेपासून भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती. भुसावळातील यावल रोडवरील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाबाहेर पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. दात्यांतर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

रावेर तालुक्यात भाविकांची मांदियाळी
रावेर– महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील प्राचीन श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरात भक्तांनी सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातून भाविकांची गर्दी झाली होती. मंदिर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिर प्रशासनाने मंदिराला रंग-रंगोटीसह सजावट केली आहे. पोलीस प्रशासनातर्फे भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी बंदोबस्त लावण्यात आला आहे.