भुसावळ:- भुसावळ विभागातील भुसावळसह अन्य तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी दिल्याने कापणीवर आलेल्या गव्हासह मक्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. रात्री आठ वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाल्यानंतर विजांचा गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच धांदल उडाली. काही शेतकर्यांनी शेतात गव्हासह मका कापून ठेवला आहे त्यामुळे त्याला फटका बसण्याची भीती आहे. रावेरसह तालुक्यातही काही ठिकाणी पावसाचा हलकासा शिडकावा झाला.