भुसावळ- भुसावळ शहराचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि रीव्हाईज डेव्हलपमेंट प्लॅन पुण्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून करुन घेण्याबाबत नगरपरीषदेने ठराव केला असून नववर्षात पुण्यातील शिवाजी नगर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्वेक्षणासाठी येणार आहेत. आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यातून जानेवारी महिन्यात पाच दिवस सर्वेक्षण करून प्लॅन तयार केला जाणार आहे. काँक्रिटीकरण रस्ते, भूमिगत गटारी, भूमिगत केबल, कचरा संकलन, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, बस स्थानक, रेल्वे स्थानक, पोस्ट ऑफिस यांच्या जागांबाबत नकाशे तयार करण्यात येतील. जानेवारी महिन्यात सलग पाच दिवस हे सर्वेक्षण केले जाईल. यामुळे डीपीआरनंतर शहरासह तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले.