सतीश पाटील यांचा भुसावळात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत दावा ; संजय सावकारेंनी स्वार्थासाठी पक्ष बदलल्याची टीका
भुसावळ : भुसावळातील आगामी आमदार हा राष्ट्रवादीचाच राहणार असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भुसावळचा सन्मान राखत आमदार संजय सावकारे यांना मंत्री केले मात्र त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलत भाजपात प्रवेश केला मात्र आगामी आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल, असे स्पष्ट मत आमदार सतीश पाटील यांनी व्यक्त केले. सावकारे हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी किती प्रामाणिक आहे हे येणारा काळच ठरवेल, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रात्री माळी समाज भवनात पक्षाचा मेळावा झाला.
यांची मेळाव्याला उपस्थिती
विधानसभेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेळाव्याला पक्षाचे उपाध्यक्ष संजय पवार, सचीन पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना पाटील, ललित बागुल, विलास पाटील, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, विजय चौधरी, पोपट पाटील, नाना पवार, काशिनाथ इंगळे, वरणगाव पालिकेतील गटनेते राजेद्र चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, मीनाक्षी चव्हाण, युवराज पाटील, रमेश पाटील, मुन्ना सोनवणे आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील यांना पुन्हा संधी
राष्ट्रवादीची स्थानिक कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली असलीतरी शनिवारच्या मेळाव्यात तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.