जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळेंचे आदेश
भुसावळ (प्रतिनिधी)- एकाच पोलीस ठाण्यात सलग पाच वर्ष सेवा केलेल्या तसेच एकाच तालुक्यात 12 वर्षांपासून एकाच ठिकाणी कर्तव्यावर असणार्या कॉन्स्टेबल, हवालदार, एएसआय, वाहन चालकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी रात्री काढले. त्यात भुसावळ शहरातील भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका, तसेच नियंत्रण कक्ष व शहर वाहतूक शाखेतील सुमारे 28 कर्मचार्यांचा समावेश आहे. अनेकांना सोयीचे ठिकाण मिळाल्याने कर्मचार्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्या अशा, कंसात बदलीचे ठिकाण
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे एएसआय आनंदसिंग धर्मा पाटील (जळगाव एमआयडीसी), भुसावळ नियंत्रण कक्षातील संजय भालचंद्र कुळकर्णी (नियंत्रण कक्ष भुसावळ), भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे शरद चावदस चौधरी (नियंत्रण कक्ष), बाजारपेठचे एएसआय सुनील श्रीधर सोनवणे (पारोळा), शहर पोलीस ठाण्याचे एएसआय धनसिंग मदन बंजारा (नियंत्रण कक्ष भुसावळ), भुसावळ शहरचे एएसआय संजयसिंग प्रतापसिंग परदेसी (भुसावळ शहर), भुसावळ तालुक्याचे एएसआय सुरेश माणिकराव वैद्य (भुसावळ तालुका), बाजारपेठचे राजेंद्र रुपचंद कोलते (बाजारपेठ भुसावळ), तालुक्याचे एएसआय हुसनोद्दीन निजामोद्दीन शेख (भुसावळ तालुका), भुसावळ तालुक्याचे हवालदार जिजाबराव नथ्थू पाटील (बाजारपेठ भुसावळ), भुसावळ शहरचे हवालदार गजानन साहेबराव देशमुख (मुक्ताईनगर), बाजारपेठचे हवालदार मोहम्मदअली सत्तारअली (भुसावळ शहर), भुसावळ शहर वाहतूकचे हवालदार लतीफखा हनिफखा पठाण (भुसावळ शहर वाहतूक), बाजारपेठचे हवालदार सोमनाथ भानुदास मोरे (बाजारपेठ), बाजारपेठचे हवालदार सुरेश समाधान माळी (बोदवड), भुसावळ शहरचे हवालदार पंडीत चावदस इंगळे (भुसावळ शहर), बाजारपेठचे हवालदार युनुस शेख (नशिराबाद), भुसावळ शहरचे हवालदार शेख रहिम शेख रज्जाक (जळगाव मुख्यालय), बाजारपेठच्या हवालदार अलका सुभाष झोपे (बाजारपेठ भुसावळ), भुसावळ शहरचे हवालदार नामदेव मुकुंद चौधरी (नियंत्रण कक्ष भुसावळ), भुसावळ तालुक्याचे हवालदार अशोक पुंडलिक गंगावणे (भुसावळ तालुका), भुसावळ शहरच्या कॉन्स्टेबल प्रतिभा रोहिदास पाटील (जिल्हापेठ), बाजारपेठच्या हवालदार भाग्यश्री रमेश चौधरी (नशिराबाद), बाजारपेठच्या एएसआय शैला प्रकाश पाचपांडे (बाजारपेठ भुसावळ), तालुक्याच्या छाया राजेंद्र पाटील (भुसावळ तालुका), बाजारपेठचे एएसआय सैय्यद अली सैय्यद अब्दुल्ला (बाजारपेठ भुसावळ), भुसावळ शहरचे चंद्रशेखर गजानन गाडगीळ (भुसावळ शहर), तालुक्याचे दत्तात्र धोंडू सोनवणे (फैजपूर) येथे बदली झाली.