Death of unknown 40-year-old man in Bhusawal City भुसावळ : शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ 40 वर्षीय अनेाळखी इसमाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत हा भिकारी असल्याचा संशय आहे.
बाजारपेठ पोलिसात नोंद
शहरातील रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी पुतळ्याजवळ 40 वर्षीय अनोळखी बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी ट्रामा केअर सेंटरला हलवले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.