भुसावळ शहरात उद्या साईभंडारा

0

भुसावळ– शहरातील जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरात वसंत पंचमीला सोमवार, 22 रोजी महाप्रसाद साईभंडार्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 65 हजार भाविक यावेळी प्रसादाचा लाभ घेतील. यासाठी मंदिर व्यवस्थापन व साईभक्तांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. वसंत पंचमीला साई भंडार्‍यासाठी 50 क्विंटल गव्हापासून बट्टी, 400 किलो तुरडाळीचे वरण, 100 क्विंटल वांग्यांची भाजी, तर 1200 किलोचा शिरा असा महाप्रसाद करण्यात आला आहे. सोमवारी दुपारपर्यंत प्रसाद वितरण झाल्यावर 20 क्विंटल तांदूळ व दहा क्विंटल तुरडाळीपासून खिचडी तयार करुन वितरण करण्यात येईल. या महाभंडार्‍यासाठी तब्बल 120 डबे तेल, 500 किलो रवा व साखर, स्वयंपाकासाठी 40 गॅस सिलेंडर, दोन टॅक्टर कोरडे जळाऊ सरपण आदींची तयारी करण्यात आली आहे. भुसावळ शहरासह तालुक्यातून तब्बल 1 लाख साईभाविक या सोहळ्यास दर्शन घेतील, असा अंदाज आहे. मंदिराच्या परिसरात 110 मंडपचा पेंडॉल तयार करून एकाच वेळी तीन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, अशी व्यवस्था आहे.