भुसावळ शहरात गणपती उत्सवाचा वाद अचानक उफाळला : ब्लेडने चढवला तरुणावर हल्ला

A minor was attacked with a blade due to an old dispute in Bhusawal भुसावळ : शहरातील लतिफा नगराच्या पुलावर गणपती उत्सवावेळी झालेल्या जुन्या वादाच्या रागातून एकावर ब्लेडने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी संशयीताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून एकावर हल्ला
तक्रारदार प्रशांत अशोक वर्मा (१७, लतिफा नगर, पंधरा बंगला, भुसावळ) यांचा संशयीत लखन उर्फ शीना ग्यानसिंग भोसले (भुसावळ) यांच्याशी गणपती उत्सवावेळी वाद झाल्याने त्या रागातून १ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भोसले याने त्याच्याकडील ब्लेडद्वारे मानेवर व डाव्या हाताच्या दंडावर हल्ला करून जखमी केले. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.