भुसावळ शहरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन

0

भुसावळ- धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी समाज बांधवांनी प्रांत कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले. याप्रसंगी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने आरक्षणाबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वी देखील संपूर्ण राज्यात आंदोलन व निदर्शने करण्यात आली होती. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास धनगर समाजबांधव पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
धरणे आंदोलनाल प्रमोद धनगर, दीपक काटकर, विशाल ठोके, स्वप्नील सावळे, अरूण धनगर, बाळु गायकवाड, देविदास चर्‍हाटे, देविदास सावळे, अमोल जुमळे, डॉ.कैलास ठाकरे, बबलू धनगर, ईश्वर काटे, गुणवंत कंखरे, अरूण काटे, आकाश काटे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, धनगर समाजाच्या एकदिवशीय धरणे आंदोलनातील मागण्यांसाठी शहरातील विविध संघटना व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. भारिपचे युवा जिल्हाध्यक्ष विजय पवार, रिपांईचे रमेश मकासरे, मीना मकासरे, तृणमुल काँग्रेसचे मुन्ना सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे क्षेत्रप्रमुख प्रमोद पाटील, भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, प्रवीण आखाडे, जिल्हा संघटन तसेच शिव व्यापारी सेना, शिक्षक सेना यांचा समावेश होता.