भुसावळ शहरात ‘भारतीयांच्या हृदयातले सरदार’ पुस्तकाचे प्रकाशन

0

भुसावळ- शहरातील लेखिका सीमा भारंबे लिखित सरदारांच्या जीवनावरील ’भारतीयांच्या हृदयातले सरदार’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी रेल्वेच्या एमओएचमध्ये झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. एमओएच विभागाचे सिनियर डीईई, टीआरएस सतीश चव्हाण, डीईई निखील सिंग, एडीईई मोहन चौधरी, संदीपकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मध्य रेल्वे युनियनचे पदाधिकारी, सरदार पटेल जयंती समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
एमओएच शेडमध्ये सरदार पटेल जयंती समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भुसावळचे डॉ.विनायक महाजन, म्युन्सीपल हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे, द.शि.विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी.राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पुस्तकात सरदारांचा जीवनप्रसाव (सन 1875 पूर्व ते 1950), संस्थानांचे विलिनीकरण, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबतचे संघर्षयात्री, त्यांच्यासोबत सरदारांचे वैयक्तिक आणि राजकीय संबंध, सरदारांचे पत्र, अनेकांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणी, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे विविध विषय मांडण्यात आले आहेत, अशी माहिती लेखिका सीमा भारंबे यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात दिली.