अध्यक्षपदी वसीम शेख तर उपाध्यक्षपदी ईकबाल खान
भुसावळ : छायाचित्रकार संघटनेला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी कमलेश चौधरी होते. यावेळी दोन वर्षात झालल्या कामकाजाचा आढावा घेवून पुढील वर्षासाठी नुतन कार्यकारणी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी वसीम शेख तर उपाध्यक्ष ईकबाल खान यांची निवड झाली.
अन्य कार्यकारीणीत सचिव सुनील सुर्यवंशी, खजिनदार विनोद गोरदे, सदस्य कालु शाहा, गोपी मेन्द्रे, हबीब चव्हाण, अभिजीत आढाव, श्याम गोविंदा यांचा समावेश आहे. कमलेश चौधरी म्हणाले की, शहरातील घडणार्या महत्वपुर्ण घटनांचे साक्षीदार छायाचित्रकार असतात यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात छायाचित्रकाराचे महत्व आहे. यामुळे सर्व छायाचित्रकारांनी येणार्या काळात संघटीतपणे काम केले पाहिजे. सूत्रसंचालन सुनील सूर्यवंशी तर आभार विनोद गोरदे यांनी मानले.