भुसावळ शहर व तालुक्यातील जनतेत समन्वय राखण्यासह कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य

0

भुसावळ शहर, तालुका व बाजारपेठ पोलीस ठाण्यातील नूतन निरीक्षकांची ग्वाही ः पदभार स्वीकारला

भुसावळ- शहर व तालुक्यातील जनतेत समन्वय राखण्यासह शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करणार असून कायदा-सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्यात रूजू झालेल्या नूतन निरीक्षकांनी दिली. मंगळवारी उभय अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांचे पद दीर्घकाळापासून रिक्त होते. नाशिक ग्रामीण येथून बदलून आलेले निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी मंगळवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्याकडून पदभार स्विकारला तर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांची धरणगावला बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अहमदनगर येथून आलेले निरीक्षक डी.आर.पवार यांनी पदभार स्विकारला. तालुका पोलिस ठाण्यातील निरीक्षक अरूण हजारे यांची एरंडोलला बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नंदूरबार येथून आलेले निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पदभार स्विकारला.