स्थानिक विकास निधीतून 67 मिनी हायमास्ट मंजूर : एकच ध्यास मतदारसंघाचा विकास- आमदार संजय सावकारे
भुसावळ- शहर व तालुक्यात विकासकामांसाठी आग्रही असलेल्या भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून व स्थानिक विकास निधीतून तब्बल 67 मिनी हायमास्ट दिवे मंजूर झाले आहेत. या दिव्यांमुळे शहर व ग्रामीण भागात लखलखाट होणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास असून यापुढे विविध विकासकामांसाठी आपण अग्रेसर राहू, अशी भूमिका आमदार संजय सावकारे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मांडली. दरम्यान, तालुक्यातील खडका येथे तीन तर कुर्हे येथे तीन हायमास्ट लावण्यात आले असून उर्वरीत ठिकाणी लवकरच हायमास्ट दिवे लावले जातील, असेही सावकारे यांनी सांगितले.
67 हायमास्ट दिव्यांमुळे होणार लखलखाट
शहरात मंजूर हायमास्ट याप्रमाणे- 1) साईचंद्र नगर, यावल रोड, 2) स्टेडीयम रोड, इंद्रप्रस्थ नगर, 3) क्रांतीसूर्य महाराणा प्रताप चौक, वसंत टॉकीजजवळील परीसर 4) सुरभी नगर, रींग रोड परीसर, 5) चमेली नगर, हनुमान मंदिराजवळील परीसर, 6) टेक्नीकल हायस्कूलजवळील परीसर 7) शारदा नगर, लक्ष्मी सागर अपार्टमेंटजवळील चौफुलीचा परीसर 8) तुकाराम नगर, शिवमंदिराजवळ, निसर्ग हॉटेल समोरील परीसर 9) एम.आय.तेली स्कूल, खडका रोड 10) एम.आय.तेली स्कूल, अयान कॉलनी परीसर 11) ठोके नगर, शांती नगर, बॉर्डर परीसर 12) विष्णू महाजन नगर जवळील परीसर 13) नारायण नगर परीसर 14) अयोध्या नगर, महादेव मंदिराजवळील परीसर 15) अयोध्या नगर, राम मंदिराजवळील परीसर 16) वसंत पाटील यांच्या मळ्याजवळ ढोर रस्ता, डी.पी.जवळील परीसर 17) सिंधी स्मशानभूमीमागे वामन वराडे यांच्या घराजवळील परीसर 18) श्रीराम हाऊसिंग सोसायटीतील चौ परीसर 19) संभाजी नगर, कैलास सोनार यांच्या घराजवळील परीसर 20) नाहाटा नगरमधील मुख्य चौक परीसर 21) साईनाथ नगर, निर्मल ऑईल मिलजवळील परीसर 22) बियाणी मिल्ट्री स्कूल मेन गेट समोरील परीसर 23) त्रिमूर्ती नगर, कंडारी शिवारातील बगीचा परीसर व पटांगण परीसर 24) चाळीस बंगला, बुद्ध विहाराजवळ
ग्रामीण भागात मंजूर हायमास्ट याप्रमाणे- सुसरी- ग्रामपंचायत हद्दीतील परीसर, फुलगाव- ग्रामपंचायत हद्दीतील परीसर, कन्हाळे बु.॥- ग्रामपंचायत हद्दीतील परीसर, कन्हाळे खुर्द- विठ्ठल मंदिर परीसर, काहुरखेडा- विठ्ठल मंदिर परीसर व बसस्थानक परीसर, वराडसीम- दगडी चौक परीसर व महारू वाणी यांच्या घराजवळील परीसर, मोंढाळे- रीक्षा स्टॉप चौक परीसर, साकेगाव- ग्रामपंचायत हद्दीतील परीसर, कुर्हे- अंबिका नगर परीसर व इंदिरा नगर तसेच होळी मैदान, कालिका माता मंदिर परीसर, विल्हाळे- मराठी शाळेजवळील व विठ्ठल मंदिर परीसर, खडका- भवानी नगर परीसर व खडका मिल जवळील परीसर तसेच ज्ञानज्योती विद्यालयाजवळील परीसर, हतनूर- विठ्ठल मंदिर परीसर, वॉर्ड क्रमांक तीन, मानपूर- ग्रामपंचायत हद्दीतील परीसर, वरणगाव- गोपाळ गावंडे यांच्या घराजवळील परीसर, हितेश वारे यांच्या घराजवळील परीसर, सिद्धेश्वर नगर, कृष्णा पाटील यांच्या घराजवळील परीसर, मोठे विठ्ठल मंदिर परीसर, बाळू भंगाळे यांच्या घराजवळील परीसर, छत्रपती चौक, बुनकर वाडा परीसर, किरण कोळी यांच्या घराजवळील परीसर, राजू धनगर यांच्या घराजवळील परीसर, वरणगाव ते कठोरा जाणारा रस्त्यालगतचा ईस्लामपूरा परीसर, बोहर्डी बु.॥ चंद्रसिंग पाटील यांच्या घराजवळील परीसर, शिंदी- सार्वजनिक बैठक हॉल परीसर, साकरी- मोहन पाटील यांच्या घराजवळील परीसर, पिंपळगाव खुर्द- गजानन महाराज मंदिर, वरणगाव रोड परीसर, अंजनसोंडे- मुख्य चौक परीसर, आचेगाव- झांबरे वाडा परीसर, आचेगाव- स्मशानभूमी परीसर, कठोरा बु.॥- ग्रामपंचायत हद्दीतील परीसर व कठोरा खुर्द- ग्रामपंचायत हद्दीतील परीसर, तळवेल- वॉर्ड क्रमांक दोन, वैदू वाडी परीसर, तळवेल- मनुदेवी मंदिर परीसर