भुसावळ-शिर्डी पालखी पदयात्रा रवाना

0

भुसावळ : आयुध निर्माणी भागातून साईमित्र परिवारातर्फे शुक्रवार 6 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास भुसावळ ते शिर्डी पालखी पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलनाजवळ विश्रांती घेवून येथील भगवान दत्तांची आरती करुन भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आला व तेथून शिर्डी येथे पायी यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पदयात्रेमध्ये नगरसेवक पिंटू कोठारी, विनोद शेठ, बिपीन इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक व 500 भाविकांनी पदयात्रेमध्ये सहभाग घेतला.