भुसावळ : शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार, 18 जून रोजीे रात्री सात वाजेपर्यंत वक्तृत्वाचे व्हिडीओ रेकॉर्डींग मागवण्यात आले आहेत.
वक्तृत्वाचे चार मिनीटाचे व्हिडिओ
भुसावळ शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार्या या स्पर्धेत वय 5 ते 12 वर्ष व 13 ते 20 वर्ष खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. कोरोना योद्धा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपली आरोग्य व्यवस्था, कोरोना योध्याच्या कुटुंबियांचे मनोगत, दैनंदिन जीवनात स्वतःला कोरोनापासून कसे वाचवाल? हे स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धकांनी या चारपैकी एका विषयावर चार मिनीटाचा व्हिडीओ रेकॉर्डींग करून तो व्हिडीओ 7709044904 या व्हाट्सअॅप नंबरवर पाठवावा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. स्पर्धकांना आपल्या विचारांचे कौशल्य दाखवण्याची चांगली नामी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून चालून आलेली आहे. या निबंध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना 19 जून रोजी आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल, असे संयोजक तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे. भुसावळ शिवसेना व सर्व अंगिकृत संघटनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले आहे.