भुसावळ शिवसेनेत तरुण रक्ताला मिळाली संधी

0

शहरप्रमुखपदी नीलेश महाजन व नितीन बर्‍हाटे तर तालुका संघटकपदी प्रा.धीरज पाटील यांना संधी

भुसावळ- आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भुसावळ शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये बदल करण्यात आले असून तरुण रक्ताला संधी देण्यात आली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर वरीष्ठ पदाधिकारी व जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

असे आहेत नूतन पदाधिकारी
तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा संघटक नीलेश सुरळकर, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, उत्तर विभाग शहरप्रमुख नीलेश महाजन तर दक्षिण विभाग शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, शहर संघटक योगेश बागुल व जगदीश खेराडे, वरणगाव शहर प्रमुख रवींद्र सुतार, वरणगाव शहर संघटक सतीश चंदणे यांची निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकार्‍यांचा भुसावळात सत्कार
नूतन पदाधिकार्‍यांचा शासकीय विश्रामगृहात उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, अ‍ॅड.श्याम गोंदेकर यांच्यासह तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, व्यापारी सेनेचे संपर्क प्रमुख अबरार ठाकरे, उपतालुकाप्रमुख पप्पू बारसे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उपस्थितीत रविवारी सत्कार करण्यात आला. दरम्यान, नूतन पदाधिकार्‍यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, अ‍ॅड.श्याम गोंदेकर, प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, नगरसेवक मुकेश गुंजाळ, हिरामण पाटील, चंद्रकांता बोरसे, पूनम बर्‍हाटे, अनिकेत चौधरी, गोलू कापडे, प्राचार्य विनोद गायकवाड, नितीन देशमुख आदींनी अभिनंदन केले.