भुसावळ हत्याकांडातील मृतांच्या वारसांना मिळणार प्रत्येकी चार लाख

0

समाज कल्याण विभागाकडून मदत मंजूर :जखमींनाही मिळणार लाखाची मदत

भुसावळ- शहरातील खरात कुटुंबातील चौघांसह अन्य एकाची हत्या करण्यात आल्याची घटना 6 ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटनेत मृतांच्या वारसांना राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोग आणि समाज कल्याण विभागातर्फे प्रत्येकी चार लाख 12 हजार 500 रुपये तर तिघा जखमींना प्रत्येकी एक लाखांची मदत मंजूर झाली आहे. वारस हक्क प्रमाणपत्र, आधार कार्ड आदी कागदपत्रे शासनाकडे पाठवल्यानंतर वारसांना मदत दिली जाणार आहे.

हत्याकांडाने राज्यात उडाली होती खळबळ
शहरातील समतानगरातील रहिवासी व भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील खरात दोन्ही मुले सोनू उर्फ रोहीत खरात, प्रेमसागर खरात आणि सुमित गजरे यांची संशयीत आरोपी शेखर हिरालाल मोघे उर्फ राजा बॉक्सर, मोहसीन अजगर खान उर्फ बॉक्सर, मयुरेश रमेश सुरवाडे यांनी हत्या केली होती. हत्याकांडानंतर आरोपी पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती तर सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या हत्याकांडाने राज्यभरत खळबळ उडाली होती.

न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र
हत्याकांडात आणखी काही जणांची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून घटनेला 6 नोव्हेंब रोजी या घटनेला महिना उलटला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या गुन्ह्याच्या तपास काहीसा मंदावला होता मात्र आता पुन्हा पोलिसांनी तपासाला गती दिलीअसून लवकरच या खटल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल, असे तपासाधिकारी तथा डीवायएसपी गजानन राठोड म्हणाले.