मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय; पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ९० कोटींची तरतूद
धुळे । शहरात भूमिगत गटारी तयार करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्याच्या कामाला १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील सांडपाणी वाहून नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटारींचा प्रस्ताव मनपाने शासनाकडे दिला होता. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यासाठी तीन महिन्यांपासून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. शहरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारी आहेत. मात्र, हे सांडपाणी सुरक्षितपणे वाहून नेऊन त्यावर प्रक्रिया करण्याचा कोणताही प्रकल्प नही. सांडपाणी थेट नदीतसोडले आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारींचा प्रस्ताव महापालिकेने शासनाला दिला. दोन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात सांडपाणी वाहून नेणार्या भूमिगत गटारींच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद केली.
महानगरपालिकेच्या प्रस्तावातून सरकारकडून निधीला मंजुरी
मनपा देणार ३० टक्के रक्कम
याचा तांत्रिक अहवाल जीवन प्राधिकरण विभागाने तयार केला. त्यावर मंत्रालयात सचिवांकडे बैठक झाली. त्यात मुख्य सचिव सुमित मलिक यांनी पहिल्या टप्प्यासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ही योजना २४८ कोटी रुपयांची आहे. त्यात महापालिकेला ३० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. या बैठकीला नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, शहर अभियंता कैलास शिंदे, मजीप्राचे सदस्य सचिव संतोष कुमार, महापौर कल्पना महाले, मजीप्राचे मुख्य अभियंता एस. जी. कालिके, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम उपअभियंता व्ही. के. सूर्यवंशी सुनिल महाले उपस्थित होते.
धुळे शहर हे विकसनशील दृष्ट्या अतिशय मागे असलेले शहर आहे. मुलभूत सेवा सुविधांपासून शहराची जनता नेहमीच वंचित राहिली आहे. धुळे शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अमृत योजनेअंतर्गत शहराला लाभ व्हावा यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. – डॉ. सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री
१४७ मीटर भूमीगत गटार
भूमिगत पाइप टाकून सांडपाणी वाहून नेण्यात येईल. याकरीता शहराबाहेर पाणी सोडताना नदीच्या दोन्ही बाजूंना पाणी शुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्धिकरणानंतर ते पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. भूमिगतगटार योजनेत शहराचे दोन भाग केले आहेत. नदीच्या दोन्ही बाजूला ते आहे. पहिल्या टप्प्यात देवपूर भागाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यात १४७ किलोमीटर भूमिगत गटारी होणार आहेत.
१४६ कोटी खर्च अपेक्षीत
मंत्री डॉ.भामरे यांच्या प्रयत्नामुळे धुळे शहराचा शासनाच्या अमृत योजनेमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत धुळे शहराच्या भुयारी गाटारींसाठी १३१ कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. अशी ना.डॉ.सुभाष भामरेंच्या भगीरथ प्रयत्नाने धुळे शहरातील भुयारी गटारी मंजुर माहिती केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. या योजनेला सुमारे १४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.