सोल कंपनी दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप; लढा सुरूच ठेवण्याचा इशारा
चाळीसगावात शेतकरी बचाव कृती समितीची मागणी
चाळीसगाव – कन्नड घाटाजवळ सोलर कंपनीने शेतकर्यांकडून दलालांच्या माध्यमातून घेतलेल्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याचा बाजारभावाप्रमाणे देण्यात आला नाही, यासाठी कंपनीच्या काही अधिकारी यांनी स्थानिक दलालांना हाताशी धरून जाणून-बुजून शेतकर्यांना कमी भावात जमिनी खरेदी विक्री केल्याचा आरोप करीत, भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीतर्फे अध्यक्ष अॅड. भरत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. कंपनीने कितीही दबाव तंत्राचा वापर केला तरी आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्याध्यक्ष किशोर सोनवणे उपाध्यक्ष धनंजय देशमुख सचिव भीमराव जाधव देवेंद्र नायक यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
शेतकर्यांवर अन्याय
कंपनीकडून शेतकर्यांवर अन्याय करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांची आर्थिक नुकसान झाले आहे. भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला कंपनीने शेतकर्यांना द्यावा ही आमची प्रथम मागणी आहे. वन कायद्यांतर्गत सोलर कंपन्यांवर कारवाई करावी कंपनीचे नावे सातबारा उतार्यावर नोंद लावण्यात येऊ नये कंपनीचे बेकायदेशीरपणे सुरू असलेले काम थांबवावे यासाठी पुरावे दाखवण्यात आले. कंपनीच्या कारभाराविरोधात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी चौकशी अहवाल महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कंपनी पि डीत शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास
प्रकल्पासाठी बोढरे शिवापूर या भागात बाराशे एकर जमीन कवडीमोल भावात घेण्यासाठी कंपनीने सोयीस्कर दलालांची व गुंडांची त्यांची घेतल्याचा आरोप प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आला आहे. यावेळी सदर जमिनीच्या देऊ केलेल्या तुटपुजा मोबदला अनेक शेतकर्यांना जबरदस्तीने घेण्यास भाग पाडण्यासाठी गुंडांचा दबाव टकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले दलालांच्या माध्यमातून दडपणाला बळी पडले व ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या त्यांना आपली व्यवहारात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे हे फसवणूक शेतकर्यांच्या लक्षात आल्याने या परिसरात शेतकर्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
न्यायासाठी लढा
शेतकरी बचाव कृती समिती या शेतकर्यांना कायद्याच्या आधारे त्यांना मोबदला मिळण्यासाठी आम्ही लढा पुकारला आहे मौजे बोढरे , शिवापूर तसेच पिंपरखेडे शि वारातील प्रभावी गावालगत वहिवाटीची शिवरस्ते हे कंपनीने बंद केलेले आहे, ते पूर्ण करून मिळावे, बेकायदेशीरित्या टॉवरची उभारणी करून जोडल्यामुळे कंपनीने विज कायदा कंपनीने मोडला आहे. आमची तक्रार अधिकारी शासनाकडे वेळोवेळी मांडलीअ सून या सर्वांना केराची टोपली दाखवण्यात आली असल्याची खंत यावेळी पदाधिकार्यांनी व्यक्त केले.