भूस्खलनात कामगाराचा मृत्यू

0

दापोली – शहरातील उदय नगरनजीक अर्बन सायन्स कॉलेज समोर बांधकाम सुरू असताना भूस्खलन होऊन कामगारांचा मातीच्या ढीगार्‍याखाली सापडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी एक कामगार किरकोळ जखमी झाला असून ही घटना रविवारी घडली आहे. विकसकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याची चर्चा दापेालीत सुरू आहे. या बाबत घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दापोली अर्बन सिनीअर कॉलेजसमोर काही दिवसांपासून जमीन सपाटीकरण करून बांधकाम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून दापेालीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने येथील जमीन निसरडी बनली आहे. त्यामुळेच ही घटना घडल्याचे समोर आले आहे.