भू-संपादन अपहार प्रकरणी आणखी एक अटकेत

0

अमळनेर– धुळे येथील महामार्ग उड्डाण पूलात संपादित जमिनीच्या कथित 2 कोटी अपहार प्रकरणी 38 लाख रुपये इतर खात्यांवर वळते करणारा संशयित भरत जाधव याला पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. आता पर्यंत 18 जणांची चौकशी केली असून अजून चार पाच जण रडार वर असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सांगितले

पिंपरी धुळे येथील दिनेश ठाकरे यांची जमीन महामार्ग साठी संपादित करण्यात आली होती त्याचा वाढीव मोबदला मिळवून देण्याच्या नावाने धुळे शिवसेना महानगर प्रमुख सतीश महाले यांनी करारनामा केला होता तसेच विनायक शिंदे यांनी त्यांच्या समर्थक मार्फत जमीन विकत घेतली होती जमिनीचा वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी दिनेश ठाकरे यांचे अमळनेर एच डी एफ सी बँकेत खाते उघडून काही रक्कम त्याला सोबत घेऊन काढून घेण्यात आली होती दिनेशला फसवून सुमारे 2 कोटी रुपयांचा अपहार करण्याचा प्रयत्न झाला. दिनेशच्या फिर्यादीवरून विनायक शिंदे व सतीश महाले याना अटक करण्यात आली असून चौकशीत भरत जाधव रा धुळे याने मोबाइलवरून ऑनलाईन 38 लाख रुपये अनेक जणांच्या खात्यावर परस्पर वळते करण्यात आले होते. त्यात दिनेश चा भ्रमणध्वनी हिसकावून घेण्यात आल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी भरत जाधव याला ताब्यात घेतले असून मुकटी व इतर ठिकाणच्या काही जणांची डी वाय एस पी रफिक शेख व पो नि अनिल बडगुजर यांनी चौकशी करून सुमारे 14 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत सूमारे 4 ते 5 जण रडार वर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.