भैरवनाथ संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र कदम

0

सांगवी – पिंपळे गुरव येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र कदम यांची निवड झाली आहे. संघाची 2018 ते 2021 या कालावधीसाठी झालेली निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामध्ये कदम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या या निवडणुकीत प्राचार्य वसंतराव जगदाळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्षपदी बबनराव रावडे, कार्याध्यक्षपदी मल्हारराव येळवे, सचिवपदी जालंदर दाते, उपसचिवपदी सुनंदा भोज, कोषाध्यक्षपदी नागनाथ निळेकर, संचालकपदी मधुकर नवले, दत्तात्रय देवकर, मीनाक्षी खैरनार, अंजेलिना फ्रान्सिस, प्रकाश बंडेवार, जनार्दन बोरोले, श्रीनिवास पानसरे.