बोरद- तळोदा येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भोई समाजाच्या राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्यात १०५ भावी वधू-वरांनी परिचय करून दिला. येथील माळी समाज मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात संत श्री भिमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
परिचय मेळाव्यात १०५ मुला मुलींनी परिचय दिला.कार्यक्रमाला हजारोच्या संखेने समाज बांधवांची उपस्थित होती. यावेळी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी,भोई समाजाचे प्रदेशध्यक्ष डॉ.हिरामण मोरे, धड़गांवचे नगराध्यक्ष सुरेखा मोरे, नगरसेवक संजय साठे,जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडीले, नगरसेविका शोभाबाई भोई, सारंगखेड्याचे सरपंच सुशीलाबाई मोरे, कार्याध्यक्ष जयवंत खेडकर, भुता भोई,हिरकन भोई, राजेश हिरकन भोई, रमेश भुता भोई, परिचय समितिचे अध्यक्ष धनलाल भोई, संतोष वानखेड़े, जालंधर भोई, तळोदा तालुकाध्यक्ष शिवदास साठे, जगदीश वानखेड़े,चंद्रकांत साठे, प्रा.रविंद्र वानखेड़ आदींसह जिल्ह्याचे व राज्याचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशश्वीवितेसाठी भोईसमाज युवक मंडळाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश वानखेडे व चंद्रकांत भोई यांनी तर आभार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले यांनी मानले.
आमदार उदेसिंग पाडवी २१ हजार, अजय परदेशी ११ हजार, योगेश चौधरी ११ हजार, संजय माळी ११ हजार, निखिल तुरखिया ५ हजार ५५५, संजय झेंडू मोरे, राजु झेंडू मोरे १५ हजार, गुलाब बुधा भोई शिरपुर यांनी रोख स्वरुपात देणग्या दिल्या.