प्रदूषण मुक्त वाहने; टेम्पोची 500 किलो वजन नेण्याइतपत वाहतुक क्षमता
बेरोजगार तरुणांसाठी व महिलांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध…
पिंपरी चिंचवड : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने शेतकर्यांच्या मुलांसाठी व शहरातील सुशिक्षित बेकार तरुणांसाठी व्यवसायाच्या संधी व रोजगार यासाठी विविध प्रयत्न केले जातात. या माध्यमातूनच माजी नगरसेवक कै. सोपानराव भोर यांच्या पत्नी कै. सिंधुताई सोपानराव भोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व महिलांसाठी सवलतीच्या दरात ‘इलेक्ट्रिकल रिक्षा व टेम्पो’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
टेम्पो व रिक्षांचे बुकींग…
हे देखील वाचा
याप्रसंगी नगरसेवक संतोष लोंढे, बिव्हिजी ग्रुपचे उपाध्यक्ष डॉ. दत्ता गायकवाड, आर. पी. आय. वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अजीज शेख, कायनेटिक ग्रीन कंपनीच्या डिमेलो, उद्योजक संतोष गायकवाड, रवींद्र थिटे, राहुल भगत, कार्तिक गोवर्धन, दिनेश रोहरा, गणेश जामगावकर, महेंद्र देवी, उद्योजक आप्पासाहेब शिंदे व सामाजिक क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळकृष्ण थोरात तसेच सुमंतराव माळवदकर, विशाल पठारे यांनी टेम्पो व रिक्षा या गाड्यांचे बुकिंग केले.
कमीत कमी ऐंशी किलोमीटर धावणार…
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी माहिती देताना सांगितले की, ही वाहने इलेक्ट्रिकल चार्जिंग वर उपलब्ध असून, दोन तास चार्जिंगमध्ये कमीत कमी ऐंशी किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाची या वाहनांची क्षमता आहे. वाहने प्रदूषण मुक्त असून टेम्पोची कॅपॅसिटी 500 किलो वजन नेण्याइतपत आहे. ही वाहने भोर कायनेटिक ग्रीन या कंपनीच्या सौजन्याने देण्यात येतील.
पंतप्रधान योजनेअंतर्गत अर्थसहाय्य…
या माध्यमातून बचत गटातील गरजू महिलांना उत्पन्नाचे साधन मिळेल. तसेच तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत प्रदूषण मुक्त अशी इलेक्ट्रिकल वाहने असतील. वाहनांसाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत अर्थसहाय्य तसेच इतर योजनांचा लाभ घेता येईल. तसेच, महिलांना व युवकांना इलेक्ट्रिकल रिक्षाद्वारे एमआयडीसी परिसर 76 किलोमीटर (3500 एकर) कमीत कमी 22 ब्लॉकमध्ये अंतर्गत वाहतूक योजना चालू करण्यात येणार आहे. त्याद्वारे कमीत कमी दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले आहे.