भोर । भोर शहर आणि तालुक्यात गणेशोत्सव शांततेत पार पडावा म्हणून भोर तालुक्यातील 24 जणांना दि.31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात हद्दपार केले असल्याची माहिती भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली आहे. तशा नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत.
यामध्ये अविनाश राजेंद्र लोणकर (रा. चौपाटी), गणेश शंकर माने (रा.चौपाटी), अस्लम मोगस शेख (रा. भोर), ज्ञानेश्वर गेनबा शिरवले (रा.नांदगाव), दशरथ किसन धोंडे (नागोबा आळी), दत्तात्रय रामचंद्र पाटने (रा. पानव्हळ), अशोक नानु शेलार (रा. आंबेघर), दशरथ शामराव सावले (रा. नेरे), विलास लक्ष्मण कंक (रा.पांगारी), गणेश ज्ञानोबा कंक (रा. पांगारी), नामदेव सीताराम मम्हसुरकर (रा.निगुडघर), भीमराव गणपत पोळ (रा. शिरगांव), हेमंत राजेंद्र कंक (रा. निगुडघर), अनिल रामचंद्र शिंदे (रा. म्हसर), आनंदा मोहन साने (रा.पर्हर), तानाजी शंकर पाटणे (रा. भोर), प्रल्हाद कोंडिबा मोरे (रा. भोर), शारदा सुरेश जमदाडे (रा. भोर), निलेश किसन सुरगुडे (रा.भेलकेवाडी), हनुमंत सोपान मळेकर (रा. पिराचा मळा), गणेश मोहिते (रा. नागोबा आळी) अशा 24 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून गणेशोत्सव काळात यांपैकी कोणीही भोर तालुक्यात राहत असल्याचे निदर्शनास आल्यास भोर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांनी केले आहे.