पुणे : एकीकडे कडक उन्ह व उन्हाच्या झळांनी जालिह्यातील नगारकि हैराण झाले असतााच शुक्रवारी संध्याकाळी भोर, खेड शिवापूर परिसरास वादळी वार्यासह पावसाने झोडपले. जिल्ह्यातील घोडेगाव परिसरातही पावसाची हलकी सर आली. मात्र, पुणे शहरासह जिल्ह्यात आकाश भरून येऊनही पावसाने हुलकावणी दिली.
पुणे, पिंपरी- चिचंवड शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही शहरांचा पारा 40 अंशांवर गेल्याने नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. गुरुवारी संध्याकाळी शहर परिसरात ढगाळ हवामान होते. शुक्रवारी दुपारनंतरही आकाशात ढगांनी दाटी केली होती. संध्याकाळच्या सुमारास शहर परिसरात जोरदार वारेही वाहत होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले होते.
जिल्ह्यातही शुक्रवारी दुपारनंतर आकाश ढगांनी भरून गेले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास भोर, खेड शिवापूर परिसरात सोसाट्याचा वारा वाहू लागाल. त्यानंतर विजांच्या कडकडाटात गोरांचा पाऊस सुरू झाला. भोर शहरात पावसाचा जोर होता. तसेच, खेड शिवापूर परिसरात महामार्गाच्या परिसरातही अवकाली पावसाचा जोर होता. गारांसह पडत असलेल्या पावसात भिजण्याचा आनंद मुलांसह मोठ्यांनीही लुटला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने भोर तालुक्यात रात्र काही काळ गारवा निर्माण झाला होता.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाळीच्या परिसरात आणि आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरात मात्र, पावसाने हुलकावणी दिली. घोडेगावमध्ये पावसाची हलकी सर येवून रस्ते ओले झाले. परंतु, जोरदार वार्यांमुळे पाऊस झाला नाही. जिल्ह्याच्या पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यातही दुपारनंतर आकाश काळवंडले होते. जोरदार वारे वाहिल्याने काही काळ परिसरात थंडावा निर्माण झाला. मात्र, त्या भागातही पावसाने हुलकावणी दिली. शहरासह जिल्ह्यात शनिवारीही दुपारनंतर गारांसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेतून वर्तवण्यात आली आहे.