तळोदा । येथील भोळ्या भाबळ्या संतोषची आपुलकी पाहून नागरिकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. संतोष हा मनोरुग्ण असून त्याला भक्तीचा मोठा भाव, शहरात कोणत्याही ठिकाणी कुठेही भागवत सप्ताह असला म्हणजे संतोष हा भागवतकार महाराजांना भेट म्हणून फळ व सत्कार म्हणून फुलगुच्छ दिल्या शिवाय राहत नाही. मोठ्या आदराने सत्कार करेल व नमस्कार करून निघून जाईल. ही त्याची कायमची पद्धत.18 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. यात अजय परदेशी यांचा विजय झाला. संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस कार्यकर्ते त्यांना गुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करत होते. हे ह्या संतोषने पाहिले, त्याच्या मनात पहिलेच भक्तीभाव असल्याकारणाने दुसर्या दिवशी संतोष हार घेऊन अजय परदेशी यांच्या बाईक शोरूम समोर हार घेऊन उभा राहिला. त्याला माहीत नाही की, अजय परदेशी हे नागपूर गेले आहेत. त्याला शोरूममधील वर्कराने विचारले की, कोणासाठी तू येथे हार घेऊन सकाळपासून आहे. तेव्हा त्याने इशाराने सांगितले की, भैयासाठी थांबलो आहे.
समाधानाने नाचला संतोष
तेव्हा त्याला सांगण्यात आले की ते बाहेर गावी गेले आहेत. तू पर्वा ये. तो एवढा हातास व निराश झाला की त्याचे आश्रू यायला लागले. त्याला समजावून शांत करण्यात आले. परंतु तो 23 तारखेला सकाळी 6 वाजेपासून अजय परदेशी यांच्या घरासमोर हार घेऊन उभा होता. अजय परदेशी हे मॉर्निंग वाकला जाऊन आल्यावर त्यानीं बरोबर त्यांचा समोर उभा राहून त्यांना हार घातला व त्याचा मनाचे समाधान करून आनंदानं नाचू लागला.सामान्य माणसाच्या नेता असलेला एक भाजीवाला व जन सामन्यात मिळून मिसळून राहणार सकाळी पानटपरीवर भेटणारा. कोणीही हाक मारली लागलीच उभा राहणारा. हा शब्द खरा ठरवत नवनिर्वाचित नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी संतोषचा भावना ओळखून भल्या सकाळी संतोषच्या शुभेच्छा रुपी फुलहार स्वीकारला