भोसरीतील आठ वर्षापासून फरार आरोपीला अटक

0
भोसरी : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील आठ वर्षापासून फरार आरोपी मंगेश सखाराम आंभोरे (वय- 28, रा. संकल्प बिल्डींग, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून शुक्रवारी भोसरी येथे अटक केली. पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस हवालदार भोसले, पोलीस नाईक काटकर, शेडगे गस्त घालताना पोलीस नाईक किरण काटर यांना भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील अंभोरे येथील एका पान टपरीवर थांबला असल्याची माहिती मिळाली. त्याने 2014 साली गंभीर गुन्हा केल्याची माहिती समोर आली. तसेच भोसरी पोलीस ठाण्यात 2010 साली केलेल्या गुन्ह्यातही तो फरार होता. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन्, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, अशोक दुधवणे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे यांनी कारवाई केली.