भोसरीतील शिवसृष्टीकडे दुर्लक्ष

0

भोसरी : महापालिकेच्यावतीने भोसरी लांडेवाडी येथे साकारलेल्या शिवसृष्टीची दुरवस्था झाली असून, त्याची योग्य निगा राखण्याची मागणी शिवसेना ग्राहक कक्षाचे शहरप्रमुख गणेश जाधव यांनी केली महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिल्प साकरली आहेत.

मात्र अनेक ठिकाणी या शिल्पांचा रंग उडाला असून, त्यावर धूळ साचली आहे. याठिकाणचे अनेक दिवे बंद असल्याने प्रकाशाअभावीही शिल्पे योग्यप्रकारे दिसत नाहीत. अनेक नागरिक या शिवसृष्टीच्या बाजुलाच वाहने लावत असल्याने ही शिल्प झाली जातात. ही बाब लक्षात घेऊन, या शिल्पांची पुन्हा रंगरंगोटी करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.