भोसरीत विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

0

उद्योजक प्रमोद महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

भोसरी : येथील प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास प्रतिष्ठान केंद्र व विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विलास मडिगेरी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, श्रेयस कटारिया, विलासकुमार एन. पगारिया, सतीश खाबिया, डॉ. ललितकुमार धोका, प्रदीप कदम, चिखलीचे प्राचार्य डॉ. हनुमंत भवारी, दमनी जैन महाविद्यालयाच्या प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. भास्कर पांडुरंग आदी उपस्थित होते.

विकासात प्रेरणा महत्वाची
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रदीप कदम म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासात प्रेरणा ही महत्वाची आहे. प्रेरणा देणे मार्गदर्शन करणे हाच व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा पाया आहे. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील एकूण 84 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पांडुरंग भास्कर यांनी केले. विभा ब्राम्हणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रेणू अगरवाल यांनी आभार मानले.