भोसरी औद्योगिक परिसरात पाण्याच्या पाइपलाइनच्या कामाची सुरुवात

0

भोसरी : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे औद्योगिक परिसरात पाण्याची पाईपलाईन बदलण्यास सुरुवात झाली.

औद्योगिक परिसरात पाण्याचे पाईप लाईन या गेल्या चाळीस वर्षांमध्ये बदलण्यात आलेल्या नव्हत्या. त्या पाईपलाईनमध्ये झाडाच्या मुळ्या जाऊन व काही ठिकाणी पाण्याची गळती सुरुवात झाली होती. त्यामुळे औद्योगिक परिसराला पुरेसा पाणीपुरवठा मिळत नव्हता. उद्योजकांना बऱ्याच वेळा टँकर मागवावे लागत होते. त्यासाठी फोरमच्या माध्यमातून वेळोवेळी पत्रव्यवहार करून, अधिकाऱ्यांशी बोलून नगरपालिका व एमआयडीसी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून यातून मार्ग काढण्यात आला. या कामास सुरुवात झाल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. बहुतांशी कारखान्यांमध्ये पाण्यावर आधारित उत्पादन प्रक्रिया आहे. कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाण्याची नितांत आवश्यकता परिसराला होती. या कामामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.