भोसरी ते मोशी महामार्ग रुंदीकरणाला विरोध

0

पिंपरी-चिंचवड : पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीतील रोशल गार्डनपासून स्पाईन चौकापर्यंत आणि स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत 60 आणि 61 मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. परंतु, या रुंदीकरणाला मोशीतील बाधित नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. महापौर नितीन काळजे यांची भेट घेऊन रस्त्याची रुंदी 45 मीटर करण्याची मागणी करण्यात आली.

महापौरांकडे मागणी
पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीतील इंद्रायणी नदी दरम्यानचा भाग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 मध्ये आहे. या रस्त्याअंतर्गत भोसरीतील रोशल गार्डनपासून स्पाईन चौकापर्यंत सुमारे 2 हजार 200 मीटर रस्ता 61 मीटर रुंदीकरणासाठी आणि स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत सुमारे 4 हजार 400 मीटर रस्ता 60 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. रुंदीकरणाला बाधित नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जागा मालकांनी महापौर नितीन काळजे यांची भेट घेतली. स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत 60 मीटर रस्ता रुंद करण्यात येणार आहे. त्याची रुंदी कमी करुन 45 मीटर करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याची 45 मीटर रुंदी करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महापौर काळजे यांनी बाधित नागरिकांना दिले आहे.