धुळे । मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर 25 रायफली, 17 रिव्हॉल्वरसह 4146 काडतूसे जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. काल रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणार्या बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. गाडीत विशिष्ट पध्दतीने खाचे तयार करुन हा शस्त्रसाठा लपविण्यात आला होता. आयजी विनॉय चौबे यांच्यासह धुळे, नाशिक, चांदवड, मालेगाव आणि मनमाड या पाचही ठिकाणचे पोलीस अधिकारी या गाडीचा पाठलाग करीत होते. सर्वांच्या प्रयत्नानंतर ही गाडी पकडण्यात यश आले. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.