रावेर। तालुक्यातील मंगरुळ येथे सर्रासपणे सुरु असलेल्या दारु दुकानांवर पोलीसांनी अचानकपणे धाड टाकून देशी- विदेशी दारुच्या 21 हजा 148 रुपये किंमतीच्या 256 बाटल्या ताब्यात घेतल्या.
हरिलाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन अनारसिंग ओंकार बारेला (वय 28) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक पिंगळे यांच्या आदेशान्वये विलास तायडे हे करीत आहे. यामुळे दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.