अमळनेर । येथील धुळे चोपडा मार्गावरील अमळनेर ते मंगरूळ गावापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर खडीचे ढीग जसेच्या तसे पडून राहिल्याने वाहन चालकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहेत. जरी पाहता अनेक दिवसांपासून असलेल्या या मागणी नंतर कामाला प्रत्यक्षपणे सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल रस्त्यावर आणूण पडला आहे. यानंतर अनेक दिवस या कामांना प्रत्यक्ष मात्र फार उशीर होत असल्यामुळे अनेक नागरीक व वाहनधारकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. महिन्याभरापासून पडून राहिलेल्या खडीचे ढिग असेच पडून राहिल्यानंतर रात्री अपरात्री यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्याकडे लक्ष घालून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांसह परीसरातील नागरीकांकडून होत आहे.
रस्त्याचे काम अपूर्णच
धुळे – चोपडा हा मार्ग वाहनधारकांचा मृत्यूचा सापळा होत चालला असून शहरातील आर.के.नगर पासून पुढे ते महावितरणाच्या कार्यालयापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या एक ते दीड महिन्यापासून एका साईडचा रस्ता खोदून त्याठिकाणी अर्धवट खडीकरण व डाबरीकरण केलेले आहे. रस्त्याच्या बाजूलाच मोठया खडीचे ठिगारे तसेच पडले असल्यामुळे त्याचा त्रास वाहन धारकांना होतो आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्याच दिवसापासून हे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पावसाळा सुरू झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारास ह्या अपूर्ण कामाची आठवण पडली की काय? असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करीत आहेत. तर मंगरूळ गावापासून पुढे रस्त्याच्या साईड पट्ट्याही खोल गेल्या आहेत पावसाळा सुरू होण्याआगोदर रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करणे गरजेचे होते.
अपघात होण्याची शक्यता
होण्याआगोदर रस्त्याच्या कामाची दुरुस्ती झाली नाही तर महावितरण कार्यालय ते सेंट मेरी शाळेपर्यंत रस्ता उंच सखल असल्यामुळे पाऊस पडल्यावर मोटर सायकल घसरण्याचे प्रमाण वाढते तर काही ठिकाणी पडलेले खड्डे व्यवस्थित न बुजल्यामुळे बर्याच वेळेस लहान लहान मोठे अपघात नेहमी होत असतात. धुळे चोपडा हा रस्ता वर्दळीचा रस्ता असून नेहमी वाहनांची ये जा असते तरी देखील सामाजिक बांधकाम विभागाने ह्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता त्वरीत व्हावा अशी मागणी नागरीकांसह वाहनधारकांची होत आहे.