पारोळा । तालुक्यातील मंगरूळ येथील मयाराम राजाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीतील बिबट्या पडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्या विहीरीत पडल्यानंतर बिबट्याला काढण्यासाठी नागरीकांचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी विहिरीजवळ मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती. त्यानुसार वनविभागाला पाचारण करण्यात आले असून विहिरीतून बिबट्याला काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे वनविभागाकडे पिंजरा नसल्याने सिडी विहिरीत टाकून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न नागरिकांसह वनविभागाचे कर्मचारी करित आहे.