मंगळग्रह मंदिरावर कमला नेहरू वसतीगृहाची सहल

0

चोपडा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृह विद्यार्थीनींची हिवाळी सहल शिवधाम व मंगळग्रह मंदिराच्या पावित्र्यपावन सान्निध्यात उत्साहात पार पडली. आदिवासी विद्यार्थींनींसाठी अमळनेरचे वृक्षवल्ली फाऊंडेशन व लायन्स 3 लबच्या महिला सामाजिक कार्यकत्यारनी अन्नदानाचा खास योग घडवून आणल्याने विद्यार्थीनींच्या आनंदात भर पडली. सर्वप्रथम विद्यार्थीनींची निमगव्हाण येथील रेलचा मारोती मंदिरात जाऊन देवदर्शनाचा लाभ घेवून सामायिक प्रार्थना केली. नंतर पारोळा रस्त्यालगत असलेल्या शिवधाम मंदिरात जाऊन शिव आख्यायिका जाणुन वृक्षांची माहिती घेतली. तदनंतर पावित्र्य तीर्थस्थळ मंगळग्रह मंदिराचे दर्शन घेतला.वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ यांनी आभार मानले. अधिक्षिका कावेरी कोळी, सविता शिरसाठ, संदीप शिरसाठ, दलसिंग बारेला व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अमळनेर येथील वृक्षवल्ली फाऊंडेशनच्या अध्यक्षा निलीमा सोनकुसरे, अनिता पाटील, राजश्री पाटील, लायन्स 3 लबच्या अध्यक्षा सोनाली मुंदडा, जास्मीन भरूचा, प्रा. नयना नवसारीकर, कल्पना शहा, राजेश सोनकुसरे या दातृत्वान सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचा योग घडवून आणून मोलाचा हात दिला. त्यात आधार संस्थेच्या भारती पाटील, संदानशिव यांनी कॅडबरी वाटून भर टाकली.