मंगेश तेंडुलकरांना ऋषितुल्य पुरस्कार जाहीर

0

पुणे । शारदा ज्ञानपीठमतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऋषितुल्य व्यक्तींचा सत्कार ऋषिपंचमीच्या दिवशी केला जाणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्यासह विविध क्षेत्रातील 14 ज्येष्ठ व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे तर यंदा व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना मरणोत्तर ऋषितुल्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शारदा ज्ञानपीठमतर्फे गेली 42 वर्षे ऋषिपंचमीला विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींना ऋषितुल्य पुरस्कार देऊन त्यांचे पूजन करण्यात येते. यंदा डॉ. स्वरूप, पुरंदरे, मोघे, जोग यांच्यासह नाथ संप्रदायाचे प्रसारक ज्ञाननाथ रानडे महाराज, व्यावसायिक रामकृष्ण देशपांडे, सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एच. एम. गणेशराव, प्राचार्य रामकृष्ण पांडे, जनसेवा रक्तपेढीचे शरद भिडे, पुणे पांजरपोळ ट्रस्टचे पृथ्वीराज बोथरा, वारकरी संप्रदायाचे प्रसारक तुळशीराम कराड, महादेव पाटील, अ‍ॅड. अनंत कुकडे यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.