मंजूर प्रस्तवातील रस्त्यांची कामे काढून करणार गटारींची कामे

0

जळगाव । महानगर पलिकेला राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या 10 कोटीच्या निधीतील कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने हा निधी महापालिकेस खर्च करता येणार नाही. या काळात मूंजर प्रस्तावातील रस्त्यांची कामे काढून त्या भागात गटारींचे कामे करण्याच्या हालचाली प्रशासनाने सरु केल्या आहे. आचारसंहीत संपल्यावर त्यास महासभेचे मंजूरी घेण्यात येणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या तीन वर्षात शहरात ठोस विकास कामे करता आलेली नाही. रस्त्यांची दुरुस्ती मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण सोडले उपनगरांमध्ये कुठलीही कामे करण्यात आली नाहीत. नुकाताच महापालिकेला 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून महापालिका प्रशासनाने शहरातील ज्या भागात रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्या भागातील रस्त्यांची कामांसाठी प्रस्ताव तयार केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव महापालिकेला 25 कोटी रुपयांचे विशेष अनुदान विकास कामांसाठी मंजूर केले आहे. याबाबतचे मुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र गेल्या महीन्यातच प्राप्त झाले आह. त्यानतंर कामांच्या प्रस्तावाला 3 डिसेंबर 2016 ला महासभेत मान्यता घेण्यात आली. या प्रस्तावांतील त्रुटींमुळे महीना उलटूनही प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी गेलेला नाही. जळगाव जिल्हापरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहीत लागु करण्यात आली आहे. जि.प. निवडणुकांची आचारसंहीत जळगाव महापालिका हद्दीत देखील लागु राहील का ? या आशयाचे पत्र महापौर नितिन लढ्ढा यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवून त्यांचे मार्गदर्शन मागविले आहे.

यात सुमारे 4 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे होती. या प्रस्तावास महासभा, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी देखील मान्यात दिली. कामांची निविदा प्रकीया देखील पूर्ण करण्यात आली. यातील काही कामांचे कार्यादेश देखील देण्यात आहेत. कामे सुरु होण्याच्या टप्प्यावर असतांना प्रशासनाने या प्रस्तावातील रस्त्यांच्या कामाऐवजी त्याच गटारींचे कामे करण्याची चाचपणी सुरु केली आहे. महापालिकेला अमृत योजना मंजूर झाली आहे. या योजनेतून शहरातील सर्व जलवाहीन्या बदलण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ते खोदले जाणार असल्याने रस्त्यांची कामे थांबविण्याचा विचार प्रशासन करीत आहेत. याचप्रकारे 3 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीतील रस्त्यांच्या कामाऐवजी देखील गटारींची कामे करता येतील का? याची चाचपणी सुरु असल्याची माहीती शहर अभियंता दिलीप थोरात यांनी दिली आहे.

4 कोटींच्या कामांना कार्यादेश
राज्य शासानाकडून ज्याप्रमाणे 10 कोटी रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले 25 कोटी रूपयांचे विशेष अनुदानाच्या प्रस्तवात त्रुटी असल्याने हा निधी येण्यास उशीर होत आहे. प्रस्तांवातील त्रुटी दुर करून जिल्हाधिकार्‍यांकडे द्यावयाचा आहे. दरम्यान, 10 कोटींच्या अनुदानातून 4 कोटी रूपयांची रस्त्यांची कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले होता. यातील काही कामांना कार्यादेश देण्यात आला आहे