मंजूर विकास आराखड्यातील रस्ताबाधितांना मिळणार सदनिका

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड जुना जकात नाका ते रावेत या मंजूर विकास आराखड्यातील रस्ताबाधितांना प्राधिकरणाच्या नवीन गृहप्रकल्पामध्ये विक्री किंमत आकारून व इतर पात्रता तपासून वन आरके व वन बीएचके सदनिका दिल्या जातील, असे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन गृहप्रक ल्पामध्ये सदनिका देण्यासाठी अटी व शर्ती लागू राहणार आहेत. तसेच, या बाधितांना 34.5 मीटर डीपी रस्ता बाधित घराच्या मालकीबाबतचा 31 डिसेंबर 2015 पूर्वीचा पुरावा सादर करावा लागणार आहे. प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पाचा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत समावेश झाल्यास पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळेल.’