मंत्रिमंडळात खडसेंचे पुनरागमन; गिरीश महाजन यांना गृहमंत्री पद?

0

मुंबई-लवकरच जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यमंत्रिमंडळ विस्तार होणार असून यात अनेक खात्यांचे खांदेपालट केले जाणार आहे. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे याचा मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ शकतो तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यमंत्रीमंडळ विस्तारत अनेकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या विस्तारत अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे.