जळगाव – मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाचे सरकार असतांना तांत्रिक बाजू भक्कमपणे मांडल्याने त्यावेळी आरक्षण दिल आणि ते टिकलंही होतं. मात्र राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये आरक्षणाबाबत मत भिन्नता असून अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला.
केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाले. त्यानिमीत्ताने जिल्हा भाजपातर्फे दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षूंना माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार महाजन यांनी सांगितले की, देशभरात मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने कार्यक्रम घेतले जात आहे. समाजात जीवनचैर्य चालविणे शक्य नसलेल्या गरजूंना मदत करण्याचे काम पक्षातर्फे केले जात आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांनाही मदत केली जात आहे. आरक्षणासंदर्भात त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीराजे अनेक नेत्यांना भेटत आहेत. मात्र भाजपाचे सरकार असतांना आम्ही तांत्रिकदृष्ट्या आमची बाजू तयार केली ती मांडली, आरक्षण दिलं. उच्च न्यायालयातही ते आरक्षण टिकलं. दुर्दैवाने आमचं सरकार गेलं. नंतरचे आघाडी सरकार हे सर्वोच्च न्यायालयात तांत्रिक बाजू मांडण्यात कमी पडले. मुळात तीन पक्षाच्या या आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणालाच विरोध असल्याचा गौप्यस्फोट आमदार गिरीश महाजन यांनी केला. संभाजीराजे हे आमचेच खासदार आहे. आरक्षण देण्यात कोण कमी पडलं? हे त्यांना माहिती आहे. तांत्रिक बाजू तंतोतंत मांडुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात आघाडी सरकारची बाजू लंगडी पडल्यामुळे न्यायालयाने आरक्षण नाकारले हेच त्यामागील खरे कारण असल्याचे आमदार महाजन म्हणाले.
Next Post