सिल्लोड : सिल्लोडचे समाजसेवक महेश शंकरपेल्ली व पुण्यातील डॉणअभिषेक हरिदास यांनी कॅबिनेट कृषी मंत्री अब्दुल सत्तार व इतर विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ ,भा.द. वी कलम 199,200 व इतर अंतर्गत केस दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणूक कामी दिलेल्या शपथ पत्रात त्यांनी शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती,शैक्षणिक अहरते बाबत तफावत असलेली माहिती सादर केली. सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते सदर आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला होता परंतु पोलिसांनी भ्रामक व त्रुटीयुक्त अहवाल देऊन आरोपीला अभय दिले असल्याबाबत फिर्यादिनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुनश्च सखोल चौकशी करून 60 दिवसात स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.